ठाणे -महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये लोक कलावंतांचा मोठा सहभाग आहे. ( Local Artist Thane ) अनेक चळवळी, आंदोलन आणि लढे उभारणे आणि समाजाचे प्रबोधन करण्याचे मोठे काम महाराष्ट्रात या लोक कलावंतांनी केले आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या प्रभावामुळे सर्वसामान्य होरपळाला असताना त्याची झळ लोक कालावंतांनाही मोठ्या प्रमाणात लागली आहे. ( Local Artist Lossed due to Corona Pandemic )
ठाण्यातील लोककलावंत शंकर गोणे यांनाही कोरोनाचा असाच फटका बसला आहे. ते हा नांदेड येथील रहिवासी आहेत. कोरोनाचे संकट आल्याने याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आधी लॉकडाऊन आणि आता निर्बंध त्यामुळे चार पैसेही मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठी हा कलाकार गावोगावी तसेच महाराष्टातील मोठ्या भक्तिस्थळांना भेट समाज परिवर्तन करत आहे. मिळेल त्या पैशावर आपली उपजीविका करत आहेत. सरकारने आम्हाला घर देण्याचे आमिष दाखवले. मात्र, अद्यापही मी असाच फिरतोय, अशी व्यथा या कलावंतानं मांडली.