महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Little Girl Rape Case : चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, नराधमाला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी वापरली 'ही' युक्ती - पोलिसांचे सर्च ऑपरेशन

Little Girl Rape Case : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधमाने सहा वर्षीय चिमुरडीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने (orture on pretext of giving chocolates) अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झाला. (girl raped and killed) या नराधमाला पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने बिहारी वेषांतर करून बिहारमधील नवाद गावातून बेड्या ठोकल्या (Police arrested Accused by disguise) आहेत. सलामत अली आलम अन्सारी (वय ३२, रा. नवाद,बिहार) असं अटक केलेल्या नराधमाचं नाव आहे.

Little Girl Rape Case
आरोपीला अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 6:30 PM IST

पोलिसांकडून नराधमाच्या कृत्याचा भंडाफोड

ठाणे Little Girl Rape Case : पोलीस पथक आपल्या मागावर गावात असल्याची कुणकुण नराधमाला लागल्याने त्याने मोबाईल बंद केला होता. त्यानंतर पोलीस पथकाने केंद्र व बिहार सरकारच्या योजना राबवण्याचा बहाणा करत तशी वेशभूषा आणि बिहारी भाषा बोलून गावातील नागरिकांना योजनेच्या लाभाविषयी माहिती देत होते. नराधमही या योजनेचा लाभ घेण्यासाठी येताच वेषांतर केलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली.

अहवाल प्राप्त होताच तपासाची दिशा बदलली :याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात सुरुवातीला अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान चिमुरडीच्या मृतदेहाचा उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याने निष्पन्न झाल्याने पोलिसांनी नरधामाविरोधात हत्येसह अत्याचार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.

अशी घडली घटना :हत्या झालेल्या मृतक चिमुरडीचे १३ सप्टेंबर रोजी आई-वडील कामासाठी निघून गेले होते. त्यावेळी सोबत तिचा नऊ वर्षांचा भाऊ घरी होता. त्यातच चिमुरडी चॉकलेटसाठी परिसरात फिरत असतानाच नराधमाने तिला चॉकलेट घेऊन देण्याच्या बहाण्याने घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह बादलीत कोंबून घराला बाहेरून कुलुप लावून फरार झाला होता.

पोलिसांचे सर्च ऑपरेशन :दुसरीकडे चिमुरडी बेपत्ता असताना सायंकाळी आई-वडील घरी आल्यानंतर मुलाने बहीण दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर आई-वडिलांनी परिसरात शोध घेत रात्री उशिरा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या हरवल्याची नोंद केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार १४ सप्टेंबर रोजी नजीकच्या वऱ्हाळा तलावामध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन घेतले होते. परंतु त्या ठिकाणी चिमुरडी आढळून आली नव्हती. मात्र १५ सप्टेंबर रोजी दुपारी परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता एका कुलूप बंद घर असलेल्या चाळीतील खोलीमध्ये प्लास्टिकच्या बकेटमध्ये मुलीचा मृतदेह कोंबून ठेवल्याचे आढळून आले होते.

आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके बिहारला :पोलिसांनी तत्काळ घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात रवाना केला. भिवंडी शहर पोलीस ठाण्यात कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला. मृतदेह शवविच्छेदन अहवालामध्ये अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानंतर नराधमाच्या घरात पोलीस पथकाने तपास करून त्याचे नाव शोधले. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके बिहार राज्यात रवाना केली होती.

पोलीस पथकाचे फिल्मी स्टाईलने वेषांतर :विशेष म्हणजे, हा नराधम घटना घडल्याच्या दिवसापासून बेपत्ता झाला होता. शिवाय गेल्या दीड महिन्यांपूर्वीच या खोलीत राहत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी नराधमाची ओळख पटवून त्याला अटक करण्यासाठी फिल्मी स्टाईलने वेषांतर केले. यानंतर बिहारमधील नवाद गावातून त्याला झडप घालून ताब्यात घेतले. दरम्यान बिहार पोलिसांच्या मदतीने कारवाई करून भिवंडी पोलीस पथकाने १९ सप्टेंबर रोजी नराधमाला भिवंडीत आणून अटक केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. Kota Student Suicide : विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोटाच्या कोचिंग सेंटरवर गुन्हा दाखल
  2. Gold Smuggling News : प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून दोन किलो सोन्याच्या पेस्टची तस्करी, विमानतळावरून दोघांना अटक
  3. Pune Murder News : पुर्ववैमनस्यातून 17 वर्षीय मुलाचा लोखंडी हत्याराने खून, सांस्कृतिक राजधानीत गुंडाराज वाढलं?

ABOUT THE AUTHOR

...view details