ठाणे - लॉकडाऊनच्या काळात रेडझोन क्षेत्रातील मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने तळीरामांनी गावठी दारूकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे, ठाण्यात हातभट्टीची गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या मालमत्ता (प्रॉपर्टी सेल) गुन्हे शाखेला मिळाली.
ठाण्यात गावठी दारू जप्त; गुन्हा दाखल - ठाणे गावठी दारू
आरोपीकडून 3 हजार 650 रुपये किंमतीची 13 लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत करण्यात आली आहे.
ठाण्यात गावठी दारू जप्त; गुन्हा दाखल
त्यानुसार, शुक्रवारी दुपारी 1.10 वा. मुंब्रा रेतीबंदर, खाडीकिनारी पथकाने छापा मारला. तसेच विठ्ठल तुकाराम शिंदे (40), रा.रेतीबंदर,कळवा याला अटक करून त्याच्याकडून 3 हजार 650 रुपये किंमतीची 13 लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली. याप्रकरणी, मुंब्रा पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 फ सह भादंवी़ कलम 188 व साथ रोग प्रतीबंधक कायदा कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.