महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane News: १३ वर्षाच्या मुलाचा लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू - Boy Dies After Falling From Sixth Floor

देशभरात अनेक ठिकाणी लिफ्ट अपघातांच्या घटना वारंवार पुढे येतात. आताही अशीच एक घटना कल्याण पश्चिम भागात समोर आली आहे. लिप्टमधून तोल जाऊन १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Thirteen year old Boy Dies
लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू

By

Published : May 4, 2023, 4:28 PM IST

माहिती देताना नातेवाईक

ठाणे: एका इमारतीच्या लिप्टमध्ये अडकल्याच्या भीतीने सहाव्या मजल्यावरून उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच, चालत्या लिप्टमधून तोल जाऊन थेट लिप्टच्या खड्यात पडून १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील गांधारे गावात असलेल्या रिध्दी सिध्दी सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हिमांशु कनोजा ( वय १३) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.



लिफ्ट मध्ये तांत्रिक बिघाड: मृतक हिमांशु यांच्या वडिलांचे गांधारे गावात असलेल्या रिध्दी सिध्दी सोसायटी जवळच लाॅन्ड्रीचे दुकान आहे. मृत हिमांशु आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करून तो परिसरातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या घरी जाऊन त्यांचे कपडे इस्त्रीसाठी आणून त्यांना पुन्हा देत होता. बुधवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास रिध्दी सिध्दी सोसायटीच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशाचे इस्त्री केलेले कपडे लिप्टमधून घेऊन गेला होता. त्यानंतर कपडे देऊन पुन्हा तो खाली जाण्यासाठी लिप्टमध्ये आला. तेव्हाच लिफ्ट मध्ये तांत्रिक बिघाड होऊन लिप्ट पाचव्या - सहाव्या मजल्याच्या मध्ये अचानक थांबली होती. त्यामुळे मृत हिमांशूला वाटले कि, आता आपण लिप्ट मध्ये अडकून राहू या भीतीने लिप्टचा दरवाजा त्याने उघडताच त्याचा लिप्टमधून तोल जाऊन तो सहाव्या मजल्यावरून लिप्टच्या खड्ड्यात पडून जागीच मृत्यू झाला.


लिप्टच्या खड्ड्यात पडला मुलगा : दुसरीकडे सायंकाळी ग्राहकांच्या घरी इस्त्रीचे कपडे घेऊन गेलेला हिमांशू बराच वेळा झाला तरीही लाॅन्ड्रीच्या दुकानात परत आला नव्हता. त्यामुळे त्याचे वडील आणि नातेवाईकानी त्याची शोधाशोध सुरू केली होती. दरम्यान रात्रीच्या सुमारास रिध्दी सिध्दी सोसायटीच्या इमारतीमधील लिप्टच्या खड्यात मुलगा पडल्याचे त्यांना समजले. त्यानंतर वडील आणि नातेवाईकांनी घाटनास्थळी धाव घेऊन लिप्टच्या खड्ड्यात हिमांशूला रक्ताच्या थारोळ्यात पाहताच, त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथे डाॅक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच मृत घोषित केल्याने कनोजा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तर या दुर्घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशी हळहळ व्यक्त करीत होते.



लिफ्ट कोसळल्याची घटना: यापूर्वीही ६ जून २०२२ रोजी २३ मजली इमारती मधील पार्किंग लिफ्टची टेस्टिंग सुरू असताना, कारसह लिफ्ट कोसळल्याची घटना कल्याण पश्चिम अहिल्याबाई चौक परिसरात घडली होती. खळबळजनक बाब म्हणजे तीन कामगार या लिफ्टमध्ये कार ठेवून लिफ्ट चेक करत होते. या दरम्यान ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन कामगार गंभीर जखमी झाले होते. कल्याण पश्चिम अहिल्याबाई चौकात पुण्य द स्काय ही 23 मजली इमारत आहे. या इमारतीमधील चार मजली पार्किंग उभारण्यात आली आहे. याच चार मजली पार्किंग मधील लिफ्टची टेस्टिंग सुरू होती. यामध्ये तीन कामगार ही टेस्टिंग करत होते. ग्राउंड फ्लो हून गाडी लिफ्टमध्ये चढवून लिफ्टवर जात असताना अचानक लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत तीन कामगार जखमी झाले. सुदैवाने त्यांचा जीव बचावला. तर एका गाडीच या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले.

हेही वाचा: Thane Crime अनैतिक संबंधात अडसर पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला काटा

ABOUT THE AUTHOR

...view details