ठाणे- केंद्र शासनाने अर्थसंकल्पात भारतीय आयुर्विमा महामंडळातील (एलआयसी) हिस्सेदारी विकण्याचे जाहीर केले आहे. या प्रस्तावाला विरोध असून याचा फेरविचार करावा, यासाठी नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फिल्ड वर्कर्स ऑफ इंडियाच्या वतीने ठाण्यातील हाजूरी या ठिकाणच्या एलआयसी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारने एलआयसीबाबत घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. खासगीकरणानंतरही एलआयसीचा मार्केटमधील वाटा 76 टक्के एवढा आहे. एलआयसीद्वारे केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांना कमी व्याजाने वित्त पुरवठा करण्यात येतो. अशा परिस्थितीत सरकारने ठेवलेल्या या प्रस्तावाने एलआयसी कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. केंद्र सरकारच्या या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली, तर त्याचा परिणाम अनेक पॉलिसीधारकांवर होण्याची शक्यता आहे.