महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे : सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शाह यांचे राज्यपालांना पत्र, विधानपरिषदेवर आमदारकीची मागणी - ठाणे सत्यजित शाह राज्यपालांना पत्र न्यूज

ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शाह यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून राज्यपाल नियुक्तीत आपल्याला आमदारकी मिळावी, अशी मागणी केली आहे. राज्यपाल आणि सरकारच्या भांडणात आपल्याला ही संधी मिळण्याची आशा आहे, असे शाह यांनी म्हटले आहे.

ठाणे सत्यजित शाह राज्यपालांना पत्र न्यूज
ठाणे सत्यजित शाह राज्यपालांना पत्र न्यूज

By

Published : Nov 6, 2020, 12:42 PM IST

Updated : Nov 6, 2020, 12:53 PM IST

ठाणे -विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकासआघाडी मध्ये खलबते सुरू असताना राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष एकीकडे पाहायला मिळत असताना, दुसरीकडे मात्र ठाण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने विधानपरिषद आमदारकीसाठी माझी नेमणूक करावी, असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवून विनंती केली आहे. त्यामुळे एक प्रकारे सामान्य माणूस देखील आमदारकीच्या रेसमध्ये असल्याचे ह्या उदाहरणानिमित्त स्पष्ट झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शाह यांनी पाठवलेल्या या पत्रामुळे ठाण्यामध्ये एकच चर्चा रंगली आहे.

कला, साहित्य, विज्ञान, सहकार चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रात तज्ज्ञ तसेच प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्तींना राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करू शकतात. त्याच्या फायदा व्हावा, यासाठी विधानपरिषदेच्या वरिष्ट सभागृहात नियुक्ती करण्याचे घटनेमध्ये तरतूद आहे.

हेही वाचा -व्हिडिओ : 'त्या' वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मोटारीच्या बोनेटवर बसवून नेले एक किलोमीटर..!

महाराष्ट्र विधान परिषद 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रीमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून सहज स्वीकारले जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकासआघाडी मध्ये संबंध पाहता त्यांनी पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी लागणार की नाही, हा प्रश्नच असल्याने गेल्या अनेक प्रश्नावर लढणारे आणि सामाजिक क्षेत्रात तसेच उच्चशिक्षित, साहित्यिक म्हणून ओळख असलेले ठाण्यातील सत्यजित शाह यांनी राज्यपालांना पत्र पाठवले आहे, तसेच माझी आमदारकीसाठी निवड व्हावी, अशीदेखील मागणी यावेळी शाह यांनी केली आहे.

सत्यजित शाह हे गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यात वास्तव्य करत आहेत. उच्चशिक्षित असलेल्या शाह यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम केले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना चार पानांचे माहिती पत्र पाठवले आहे. ता पत्रात त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा पाठवला असून माझ्या कामाची दखल घ्यावी आणि माझी नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. या पत्रामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली असून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्या भांडणात आमदार म्हणून मला संधी मिळावी, अशी आशा सत्यजित शाह यांनी बाळगली आहे.

हेही वाचा -'या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे': सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने बनवले रेल्वेचे घर

Last Updated : Nov 6, 2020, 12:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details