ठाणे -अंबरनाथ मधील मोरीवली एमआयडीसी परिसरातील अगरबत्तीच्या कंपनीला शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास भीषण आग लागली आहे. 'मीरा धूप अगरबत्ती' असे कंपनीचे नाव असून, आगीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र, आगीचे कारण अस्पष्ट आहे. कंपनीमधील केमिकलने भरलेल्या ड्रमचे स्फोट होत असल्याने आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळा येत आहे.
ठाण्यातील मोरीवली एमआयडीसी परिसरातील अगरबत्ती कंपनीला भीषण आग हेही वाचा... VIDEO : भररस्त्यात महिलेला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
घटनास्थळी अग्निशमन केंद्राचे पथक आले असून, एका पाण्याच्या टँकरच्या मदतीनेही आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अग्निशमन केंद्राकडून अजून, मदत मागविण्यात आली आहे. अद्याप अद्याप कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.
चांगली बाब म्हणजे, आग लागली त्यावेळी कंपनीत काम करणारे कामगार सायंकाळी 7 वाजल्याच्या सुमारास बाहेर पडले होते, त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.