ठाणे- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे काही रुग्णालये रुग्ण दाखल करून घेण्यास नकार देत आहेत. अशातच भिवंडीमधील रुग्णालयामध्ये देखील कृत्रिम प्राणवायुचा तुटवडा जाणवत असल्यामुळे रुग्णाची दगावण्याची संख्या वाढणार असल्यामुळे प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष : ठाणे जिल्ह्यातील काही भागात 'ऑक्सिजन'चा तुटवडा, रुग्ण दगावण्याची संख्या वाढण्याची भीती - ठाणे खासगी कोविड सेंटर बातमी
राज्यातील ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढली आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढत असताना येथील रुग्णालयातही कृत्रिम प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी शहरांतील रुग्णालयांत गेल्या दोन दिवसांपासून कृत्रिम प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे काही रुग्णालये रुग्ण दाखल करून घेण्यास नकार देत आहेत. रुग्णाच्या जीवाशी खेळ होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचे या रुग्णालयांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर प्राणवायूचा तुटवडा होऊ नये या साठी सर्वानीच जर पाऊले उचलली तर प्रश्न सुटू शकणार आहे.
अनलॉक चार उघडल्या नंतर आता रुग्णालयामध्ये ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता जाणवू लागली आहे. एकीकडे इंडस्ट्री सुरू झाली असतानाच दुसरीकडे रुग्णालयाला सिलिंडर पुरविले तर नक्कीच प्रश्न सुटणार आहे.
मागणी वाढली
कोरोनाग्रस्ताला ऑक्सिजनची गरज पडते. साधारणपणे दोन रुग्णांना एक असा सिलिंडर लागतो. त्यामुळे या आजाराच्या काळात सिलिंडर्सची मागणी वाढली आहे. या याधी एक सिलिंडर चार ते पाच रुग्णांना लागत असे. पण कोविडच्या प्रादुर्भावमुळे ही मागणी वाढली आहे.