ठाणे - कोरम मॉलमध्ये बुधवारी पहाटे बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली. मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याची हालचाल कैद झाल्यामुळे तो मॉलमध्ये आल्याचे उघडकीस आले. हा बिबट्या रात्रभर पार्किंगमध्ये फिरत असल्याचेही सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
कोरम मॉलमध्ये बिबट्या, नागरिकांमध्ये दहशत - कोरम मॉल
ठाण्यातील कोरम मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बुधवारी बिबट्याची हालचाल कैद झाली. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागामार्फत संपूर्ण मॉलची आणि परिसराची पाहणी करण्याचे काम सुरू आहे.
बुधवारी पहाटे कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये बिबट्या शिरला होता. घटनेची माहिती मॉल प्रशासनाला मिळताच त्यांनी याची माहिती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना दिली. यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन केन्द्र, वन विभाग, पोलीस अधिकारी दाखल झाले.
मॉलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये बिबट्या मॉलच्या संरक्षक भिंतीवरून पहाटे साडेपाचच्या सुमारास बाहेर गेल्याचे निदर्शनास आले. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागामार्फत संपूर्ण मॉलची आणि परिसराची पाहणी करण्याचे काम सुरू आहे.