महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

समाजमाध्यमावर विधानसभेची प्रश्नपत्रिका व्हायरल; उत्तरे देण्यासाठी नेटकऱ्यांमध्ये चढाओढ - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र सुज्ञ जनता आयोजित प्रथम पंचवार्षिक विधानसभा परीक्षा 2019-20 या नावाने प्रश्नपत्रिका तयार करून ती समाजमाध्यमवर व्हायरल करण्यात आली आहे.

विधानसभेची प्रश्नपत्रिका

By

Published : Oct 19, 2019, 11:35 AM IST

ठाणे- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे सर्वच दिग्गज पक्षांनी आपआपले जाहीरनामे, वचननामे, संकल्पपत्रे जाहीर करून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यातच समाजमाध्यमावर विधानसभेच्या निवडणुकीची अशी एक भन्नाट प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांमध्ये उत्तरे देण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे.

हेही वाचा - बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक गावडे यांच्या प्रचार रॅलीत 'लागीर झालं जी'च्या कलाकारांचा सहभाग

महाराष्ट्र सुज्ञ जनता आयोजित प्रथम पंचवार्षिक विधानसभा परीक्षा 2019-20 या नावाने प्रश्नपत्रिका तयार करून ती समाजमाध्यमवर व्हायरल करण्यात आली आहे. या प्रश्न पत्रिकेत भन्नाट असे सध्याच्या राजकीय घडामोडीवर प्रश्न विचारले असून एकूण 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका असून रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे द्या आणि जोड्या लावा नमूद प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर प्रश्नाची उत्तरे देणाऱ्यास व या सर्वांतून बोध घेऊन योग्य पक्षास मतदान करणाऱ्यास सुज्ञ मतदार घोषित केले जाईल, अशी टीपही नमूद करण्यात आली आहे.

विधानसभेची प्रश्नपत्रिका

ABOUT THE AUTHOR

...view details