ठाणे Shinde Thackeray Factions Marriage :शिवसेनेत उभी फूट पडून सरकार उलथल्यानंतर राज्याच्या राजकारणात शिंदे आणि ठाकरे गटामध्ये वैर वाढले. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. (bride belongs to Thackeray group) शिवसेना शाखांवरूनही दोन्ही गट अनेकदा आमने-सामनेही आले. असे असताना ठाण्यातील एका लग्नात सेनेच्या दोन्ही गटाचे नेते चक्क वऱ्हाडी म्हणून सहभागी झाल्याचे गुरुवारी दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (CM Eknath Shinde)
दोन्ही गटांच्या नेत्यांची विवाहाला उपस्थिती:ठाण्यात कासारवडवली येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यात 'वर' शिंदे गटाचा तर 'वधू' ठाकरे गटाची होती. या विवाह सोहळ्याला दोन्ही गटातील नेते उपस्थित राहिल्याने या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या ठाण्यातून या वैराला सुरुवात झाली त्याच ठाण्यात हा विवाह सोहळा होता. शिंदे गटाचे आमदार रविंद्र फाटक यांचे स्वीय सहाय्यक अजिंक्य गावकर आणि ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा समन्वयक Adv. आरती खळे यांचा शुभ विवाह गुरुवारी रात्री पार पडला. या निमित्ताने दोन्ही गटातील नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि दोन्ही गटाचे स्थानिक पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते.