ठाणे -कोरोना काळात अनेक उद्योगधंद्यांना या आर्थिक फटका बसला आहे. अनेक नवीन उद्योगही कोरोना काळात पूर्णपणे बंद पडलेले असून सुरू असलेले उद्योगही संथगतीने सुरू आहेत. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात महत्त्वाचा भाग असलेला लॉन्ड्री व्यवसायही डबघाईला आलेला आहे. निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता असली तरी काही धंदे हे जैसे तेच आहेत.
कोरोनामुळे व्यवसायिक अडचणीत आले आहेत. रोजचा खर्च चालवणे, मुलांचे शिक्षण, वीज बिल यात होती ती जमापुंजी वापरले आहे. त्यामुळेच हलाखीचे दिवस सर्वच व्यावसायिकांना पाहायला लागलेले आहेत. अनेकांवर तर रोजगार नसल्यामुळे गावी जाण्याचीही वेळी आली होती. पण, काहींनी गावी न जाता परिस्थितीशी दोन हात करत येथेच राहण्याचा निर्णय घेतला व त्यातूनच आम्ही सर्व सावरलेले आहे, असे मनोगत व्यावसायिकांनी वक्त केले आहे.