ठाणे- ठाणे महानगरपालिकेचे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या दुपारच्या जेवणात आळ्या आढळून आल्या आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
ठाण्यातील कळवा भागात असलेले ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. या रुग्णालयात ग्रामीण भागातून तसेच ठाणे जिल्ह्यातून गरीब आणि गरजू रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र, या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नेहमीच येथील गैरसोयी व रुग्णालयाच्या गलथान कारभाराला सामोर जावे लागते. असाच एक प्रकार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सलमा शेख या रुग्णाच्या दुपारच्या जेवणात आळ्या आढळल्या. यामुळे रुग्णालयात खळबळ उडाली. उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णांना पोषक आहार देणे ही शासकीय रुग्णालयाची जबाबदारी आहे. मात्र, अशा प्रकारचे जेवण मिळाल्यानंतर त्यांचे आरोग्य आणखी धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
दोन तासाने कशा आल्या अळ्या ठेकेदार
रुग्णालय प्रशासनाने जेवण बनवण्याचे काम विशाल मोरे या खासगी ठेकेदाराला दिले आहे. मात्र विशाल मोरे या प्रकाराची जवाबदारी ढकलत, जेवण देऊन दोन तास झाल्यानंतर त्यात आळ्या कशा आल्या, सवाल उपस्थित करत बदनामी करण्याच्या प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.