महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंब्य्रात पेपरवाला चाळीत कोसळली दरड; 1 जखमी - पेपरवाला चाळ

या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही.वित्ती हानी मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंब्य्रात पेपरवाला चाळीत कोसळली दरड

By

Published : Aug 3, 2019, 10:05 PM IST

ठाणे- शुक्रवारी दुपारपासून सात्यत्याने मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंब्रा हनुमान नगर- 1, ठाकूरपाडा, पेपरवाला चाळ येथे दरड कोसळली. यामध्ये एक 16 वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. तर बसेरा इमारतीच्या 4 माळ्याचा भाग तिसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये कोसळला. मात्र, या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पालिकेने या ठिकाणी 23 सदनिका आणि 6 दुकाने सील केली आहेत.

मुंब्य्रात पेपरवाला चाळीत कोसळली दरड

मुंब्रा ठाकूरपाडा पेपरवाला चाळ येथे हनुमान नगर- 1 डोंगरपायथ्याशी बांधण्यात आलेल्या घरांवर दरड कोसळली. त्यामुळे 3 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये 16 वर्षीय अविनाश हा घरात झोपला होता. त्यामुळे तो जखमी झाला. यामध्ये अविनाशच्या पायाला आणि खांद्याला जबर दुखापत झाली आहे. तर, या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. वित्तीहानी मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंब्रा परिसरातील रशीद कंपाऊंडमधील बसेरा इमारतीच्या बी विंगमध्ये शनिवारी सकाळी अचानक चौथ्या माळ्यावरच्या बेडरूमचा भाग हा तिसऱ्या माळ्यावर पडला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवाने यावेळी घरातील सर्वजण बाहेर होते. बसेरा इमारत 4 माळ्याची आहे. या इमारतीत 23 सदनिका आणि 6 दुकाने होती.

शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दिवा प्रभाग समितीचे उप-अभियंता सचिन कदम, आणि अतिक्रमण विभागाचे साबळे, यांच्यासह मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गडे यांनी भेट दिली. यावेळी इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारत आणि दुकाने खाली करून पालिकेने सील करण्याची कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details