महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक गावडे यांच्या प्रचार रॅलीत 'लागीर झालं जी'च्या कलाकारांचा सहभाग - publicity rally of ashok gawade news

यावेळी 'टॅलेंट'च्या भूमिकेतील महेश जाधव, 'विक्या'च्या भूमिकेतील निखिल जाधव, अजिंक्य ही व्यक्तीरेखा साकारणारा नितीश चव्हाण, 'भैय्या साहेब' ही भूमिका साकारणारा किरण गायकवाड आणि 'राहूल्या' हे पात्र साकारणारा राहूल मगदूम हे प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.

बेलापूर मतदार संघाचे उमेदवार अशोक गावडे यांच्या प्रचार रॅलीत 'लागीर झाल जी'च्या कलाकारांचा सहभाग

By

Published : Oct 19, 2019, 8:38 AM IST

ठाणे - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकले आहे. उमेदवारांच्या प्रचाराची धुमधामही पाहायला मिळतेय. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले. त्यामुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अस्तित्व धोक्यात येते की काय ही भावना निर्माण झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने बेलापूर मतदार संघातून अशोक गावडे यांना उमेदवारी देऊन युतीला धक्का देण्याची तयारी सुरू केली. त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये गावडेंनी 'झी- मराठी' वरील 'लागीर झालं जी'या मालिकेचे कलाकार सहभागी झाले होते.

नवी मुंबईत स्थानिक नागरिकांशिवाय बहुसंख्य पश्चिम महाराष्ट्रातील लोक राहतात. त्यामुळे नवीमुंबई नेहमीच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरला आहे. भाजीपाला मार्केट संघाचे अध्यक्ष, पुर्व उपमहापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांना बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ रोड शो करण्यात आला होता. यावेळी झी मराठी वरील 'लागीर झालं जी' या सुप्रसिद्ध मालिकेचे कलाकार या रोड शो मध्ये सहभागी झाली होते.

अशोक गावडे यांच्या प्रचार रॅलीत 'लागीर झाल जी'च्या कलाकारांचा सहभाग

हेही वाचा -'बॉईज'ना टक्कर द्यायला सिल्व्हर स्क्रीनवर 'गर्ल्स'ची एन्ट्री, टीझर प्रदर्शित

यावेळी 'टॅलेंट'च्या भूमिकेतील महेश जाधव, 'विक्या'च्या भूमिकेतील निखिल जाधव, अजिंक्य ही व्यक्तीरेखा साकारणारा नितीश चव्हाण, 'भैय्या साहेब' ही भूमिका साकारणारा किरण गायकवाड आणि 'राहूल्या' हे पात्र साकारणारा राहूल मगदूम हे प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.
संध्याकाळी ४ वाजता ही प्रचार रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथून सुरू झाली होती. त्यानंतर जुई नगर नेरुळ मार्गे बेलापूरपर्यंत काढण्यात आली.

हेही वाचा -खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुरबाड येथील प्रचार सभेला मुसळधार पावसाचा फटका

ABOUT THE AUTHOR

...view details