महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट; एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर - thane police news

बदलापूर पश्चिमेच्या वडवली भागातील वुड पिकर इंडिया सर्विस या दुकानात शनिवारी सायंकाळच्या सुमारास दुकानात अग्निरोधक सिलेंडरमध्ये नायट्रोजन भरले जाते होते. यावेळी अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन गणेश मस्के कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक कामगार गंभीर जखमी झाला.

labour dead in cylinder blast at badalapur
नायट्रेजन सिलेंडरचा स्फोट; एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

By

Published : Jan 13, 2020, 3:53 AM IST

ठाणे- अग्निरोधक सिलिंडरमध्ये नायट्रोजन भरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक गंभीर झाला आहे. गणेश मस्के असे मृत कामगाराचे नाव आहे.

बदलापूर पश्चिमेच्या वडवली भागातील वुड पिकर इंडिया सर्विस नावाचे दुकान आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास दुकानात अग्निरोधक सिलिंडरमध्ये नायट्रोजन भरले जाते होते. यावेळी अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन गणेश मस्के कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलीस घटनास्थळी आले. अग्निशमन दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यांनतर पंचनामा करण्यात आला. तर मृताच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दुकान मालक गौरव बिहाडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा - 'सरकार कोणाचंही असो त्याच्याकडे पैसे नसतात, पण माझ्या खिशात ४ लाख कोटी रुपये आहेत'

ABOUT THE AUTHOR

...view details