ठाणे :कामगाराच्या हत्ये प्रकरणीभिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून फरार आरोपी कामगाराला काही तासातच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद हनीफ इस्माईल (वय, २४) असे अटक केलेल्या आरोपी कामगारचे नाव आहे तर शफाउद्दीन राहत हुसेन (वय ३१) असे मृतक कामगाराचे नाव आहे.
दोघेही उत्तर प्रदेशचे : पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार मृतक शफाउद्दीन आणि आरोपी मोहम्मद हनीफ हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेश मधील बाराबंकी जिल्हातील रहिवाशी असून ते सोनाळे गावातील वेगवेगळ्या चाळीच्या खोलीत राहत होते. हे दोघेही उदरर्निवाहसाठी भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या हद्दीत असलेल्या माल्टा कंपनीत काम करीत होते. २६ मार्च (रविवारी ) नेहमी प्रमाणे कंपनीत काम करत असताना दुपारी ११ च्या सुमारास मृतक शफाउद्दीन हा कंपनीतील एका ट्राॅलीमध्ये साहित्य टाकून नेत असताना अचानक आरोपी कामगार मोहम्मद हनीफ याला ट्राॅलीचा धक्का लागला. यावरून दोघात वाद झाला. यात आरोपी मोहम्मद हनीफ याने कंपनीतील शफाउद्दीनला जोरात मारले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन शफाउद्दीन ठार झाला. नंतर आरोपी मोहम्मद हनीफ हा घटनास्थळावरुन फरार झाला होता.