ठाणे -लाखोंच्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या 'गब्बर' नावाचा सराईताला अटक करण्यात आले होते. त्याने आपल्या दोन साथीदारांसह भिवंडी तालुक्यातील भूमी इंडस्ट्रियल मधील कृष्णा फॅब्रीक्सच्या गोदामातून ७ लाख ६८ हजार रुपयांचे सोफ्याकरिता लागणारे कापडाचे वेगवेगळ्या कंपनीचे रोल एका टेम्पोत भरून लंपास केले होते. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी गब्बर उर्फ अजय हरिजन (वय, ३५, रा. एरोली, नवीमुंबई ) मोहम्मद इरफान जैनुलआबिदिन शेख (वय, २७,रा, वडाळा मुंबई) संतोष खरात (वय, ३८, रा. एरोली, नवीमुंबई ) असे लाखोंच्या घरफोडी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या आरोपी त्रिकूटाकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमालासह टेम्पो जप्त करण्यात आला आहे. तर अनेक लाखोंच्या घरफोड्या करूनही 'गब्बर' भिकारीच राहिल्याने तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सीसीटीव्ही फुटजेमुळे 'गब्बर' पोलिसांच्या जाळ्यात ...
घरफोडीचे गंभीर स्वरूप पाहता सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढाले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अभिजित पाटील, नितीन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक जे. आर. शेरखाने , यांच्यासह पोलीस पथकाने तपासला गती देत, चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक टेम्पो त्या दिवशी जाताना दिसला , या टेम्पोच्या नंबरवरून पोलीस घरफोड्या 'गब्बर' व त्याच्या साथीदारांपर्यत पोचवली आणि त्याला बेड्या ठोकल्या.