ठाणे - कोल्हापूर, सांगली पूरस्थितीमुळे दुधामध्ये जवळपास ४० ते ५० टक्के कपात झालेली आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
कोल्हापूर, सांगली पूरस्थितीमुळे ठाण्यामध्ये दुधाचा तुटवडा - कोल्हापूर, सांगली पूरस्थिती
कोल्हापूर आणि सांगलीमधून गोकुळ आणि वारणा दूध ठाण्यामध्ये येत असते. मात्र, गेल्या ८ दिवसांपासून उद्धभलेल्या कोल्हापूर, सांगली पूरस्थितीमुळे ठाण्यामध्ये दुधाची आवक बंद झाली आहे. त्यामुळे इतर कंपन्यांचे दूध ग्राहकांना मिळत आहे
कोल्हापूर आणि सांगलीमधून गोकुळ आणि वारणा दूध ठाण्यामध्ये येत असते. मात्र, गेल्या ८ दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये दुधाची आवक बंद झाली आहे. त्यामुळे इतर कंपन्यांचे दूध ग्राहकांना मिळत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास १५ ऑगस्ट आणि रक्षाबंधनाच्या दिवशी ग्राहकांना दूध मिळणार नाही. दुधाची कमतरता असल्यामुळे ग्राहकांना २ ऐवजी एकच लिटर दूध दिले जात आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे मागणी दूध विक्रेत, ग्राहक आणि डेअरी मालक करीत आहेत.