महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात मिळतोय देवगडचा अस्सल हापूस; पहा कसा ओळखायचा - हापूर आंबा जीआय टॅग बातमी

कोकणातील शेतकऱ्यांनी जीआय टॅग असलेला आंबा बाजारात आणलाय. ठाण्यात तुम्हाला हा आंबा सहज उपलब्ध आहे. तसेच अस्सल हापूस कसा ओळखायचा, याबद्दलही या शेतकऱ्यांनी सांगितलंय.

original hapus mango in thane
ठाण्यात मिळतोय देवगडचा अस्सल हापूस

By

Published : Apr 30, 2021, 1:32 PM IST

ठाणे- आपण केमिकल युक्त आंबे तर खात नाही ना? तुम्ही जो आंबा खाताय, तो खरच हापुस आंबा आहे का? असे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात. या सर्व प्रश्नांवर देवगडच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी उपाय शोधला आहे. या शेतकऱ्यांनी जीआय टॅग असलेला आंबा बाजारात आणलाय. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, देवगडच्या हापूसची मागणी वाढत आहे. त्यामुळे कोकणातून इतर ठिकाणी आंबे पोहोचवण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहे.

ठाण्यात मिळतोय देवगडचा अस्सल हापूस..

नागरिकांना देवगडचा हापूस ओळखता येत नसल्याने केरळ आणि कर्नाटकातील आंब्याची देवगड आंबा म्हणून विक्री केली जाते. तसेच रासायनिक प्रक्रिया करून आंबे पिकवण्याचे प्रमाणही वाढले आहे. केमिकलयुक्त आंबा ओळखायचा असेल तर त्याचा वास घेऊन बघा, ज्या आंब्यांना वास नसेल तो केमिकलयुक्त असतो, असे सीताराम राणे यांनी सांगितले.

जीआय टॅग म्हणजे काय?

जीआय टॅग हे भौगोलिक मानांकन असते. जीआय हे प्रामुख्याने कृषी, नैसर्गिक किंवा उत्पादित उत्पादन (हस्तकला आणि औद्योगिक वस्तू) असते जे एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशातून उत्पादित होते किंवा त्या भागाला दर्शविते. जीआय टॅग हे वस्तूच्या गुणवत्तेची आणि विशिष्टतेची हमी देते. तसेच एकदा जीआय संरक्षणाची परवानगी मिळाल्यास, कोणताही अन्य उत्पादक या समान उत्पादनांच्या वस्तू बाजारात आणून या नावाचा दुरुपयोग करू शकत नाही. हे ग्राहकांना त्या उत्पादनाच्या सत्यतेबद्दल हमी देते.

ठाण्यात मिळतोय देवगडचा अस्सल हापूस

40 टक्के उत्पादन-

अवकाळी पाऊस आणि वातावरण बदलामुळे यावर्षी राज्यात हापूस आंब्याचे केवळ 40 टक्के उत्पादन झाले आहे. त्यामुळे यावर्षी हापूसचे दर वधारले आहे. आकारानुसार एक डझन आंब्याची किंमत सहाशे ते बाराशे रुपयापर्यंत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details