महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Knife Attack On Youth: भांडणाच्या रागातून तरुणाच्या पोटात खुपसला चाकू, २० तासानंतर ऑपरेशन करून चाकू काढला - युवकावर चाकूहल्ला

Knife Attack On Youth: दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने (Knife attack Of child affected by legal conflict) ३० वर्षीय तरुणाच्या पोटात चाकू खुपसून पळ काढण्याची घटना समोर आली आहे. (knife stuck in stomach removed) ही घटना उल्हासनगर रेल्वे स्टेशन रोडवरील एका सॅन्डविजच्या दुकानासमोर घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोटात खुपसलेला चाकू डॉक्टरांनी २० तासानंतर ऑपरेशन करून पोटाच्या बाहेर काढण्यात यश मिळवले.

Knife Attack On Youth
२० तासानंतर ऑपरेशन करून चाकू काढला

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 10:35 PM IST

विधिसंघर्षग्रस्त बालकाचे कृत्य सांगताना पोलीस अधिकारी

ठाणेKnife Attack On Youth:घटनेप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी विधीसंर्घषग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. तर नितेश दिंगबर वालेकर (वय ३०, रा. डिंपल पॅलेस, उल्हासनगर कॅम्प नं. ३) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

भांडणातून केला चाकूहल्ला:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी नितेश हा उल्हासनगर कॅम्प नं. ३ मधील डिंपल पॅलेसमध्ये कुटुंबासह राहतो. दोन दिवसांपूर्वी १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाला नितेशने दुचाकीवरून जात असताना रागाने पहिले होते. याच वादातून दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर ३ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास नितेश हा उल्हासनगर रेल्वे स्टेशन रोडवरील महाविद्यालयाच्या लगतच असलेल्या सॅन्डविजच्या दुकानासमोर मित्रांसोबत उभा होता. त्याच सुमाराला हा विधी संघर्षग्रस्त बालक त्याच्या साथीदारासह त्या ठिकाणी आला असता, पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. हा वाद सुरू असतानाच बालकाने त्याच्या कमरेला खोसलेला चाकू काढून नितेशवर चाकूहल्ला केला आणि घटनास्थळावरून पळून गेला.

बरगड्यात अडकलेला चाकू काढण्यात यश:नितेशच्या पोटात चाकू खोलवर खुपसल्याने त्याला गंभीर जखमी अवस्थेत मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, पोटात चाकू खुपसून अडकल्याने त्याच्यावर तातडीने ऑपरेशन केल्यास त्याचा जीव वाचवू शकतो. त्यामुळे त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर येथील डॉक्टरांनी २० तासानंतर ऑपरेशन करून त्याच्या पोटातील बरगड्यात अडकलेला चाकू बाहेर काढण्यात यश मिळविले. घटनेचे गांभीर्य पाहून जखमी नितेशच्या तक्रारीवरून १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ५०४, सह म. पो. का. कलम ३७(१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

बालकाचा उल्हासनगर मधून ताबा:याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याशी संपर्क साधला असता, आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना केली गेली. त्यानंतर आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला उल्हासनगर मधूनच ताब्यात घेतले. आज त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय ताब्यात असलेल्या विधी संघर्ष बालकाने ठाणे पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

  1. Six People Murdered in Deoria : उत्तर प्रदेश हादरलं! जुन्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्यासह 6 जणांची हत्या
  2. Sasoon Drugs Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जातानाचा CCTV समोर; सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती समोर
  3. Fraud : व्यवसायिकाला चौघांनी लावला 151 कोटींचा चुना

ABOUT THE AUTHOR

...view details