ठाणे- कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली मतदारसंघातील एस. व्ही. जोशी विद्यालय येथील मतदान केंद्राला 'पिंक बूथ' नाव देवून येथे संपूर्ण निवडणूक यंत्रणासह सुरक्षा रक्षक म्हणूनही महिला अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली. या बूथवर येणाऱ्या प्रत्येक मतदारांचे 'महिला राज' कडून गुलाबाची फुले देऊन स्वागत करण्यात येत आहे.
कल्याण लोकसभा: डोंबिवलीतील पिंक बूथवर ‘महिला राज’; प्रत्येक मतदारांचे गुलाबांच्या फुलांनी स्वागत - कल्याण
मतदान केंद्रावर संपूर्ण निवडणूक यंत्रणासह सुरक्षा रक्षक म्हणूनही महिला अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. या मतदारसंघातील ६ विधानसभा मतदार संघातील प्रत्येक एक सखी मतदान केंद्र आहे. त्यामध्ये डोंबिवलीतील एस. व्ही. जोशी शाळेत, अंबरनाथमध्ये चिंचपाडा येथील फादर एन्गल स्कूल, उल्हासनगर महापालिका आणि प्रशासक शहर वसाहत या दोन केंद्रावर, कल्याण पूर्वेत तिसगाव येथील नूतन ज्ञान मंदिरात, कल्याण ग्रामीणमध्ये लोढा वर्ल्ड स्कूल पलावा आणि मुब्रा कळवामध्ये मनीषा विद्यालय कळवा या केंद्रावर महिला अधिकारी कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी देखील महिला पोलीसांचीच नेमणूक करण्यात आली आहे. या सहाही मतदान केंद्रावर प्रत्येक मतदारांचे गुलाबाची फुले देऊन स्वागत करण्यात येत आहे.