महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kisan Long March : ‘शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य', शेतकऱ्यांचा संप अखेर मागे - जेपी गावित किसान लाँग मार्च प्रतिक्रिया

शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी सुरू केलेला ऐतिहासिक संप मागे घेण्यात सरकारला अखेर यश आले आहे. तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कोअर कमिटीच्या बैठकीत संपाबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

शेतकऱ्यांचा संप अखेर मागे
Kisan Long March stopped

By

Published : Mar 18, 2023, 1:49 PM IST

Updated : Mar 18, 2023, 9:24 PM IST

शेतकऱ्यांचा संप अखेर मागे

ठाणे :आमच्या सर्व मागण्या मान्य करून त्याची तातडीने अंमलबजाणी करावी, तरच आम्ही माघारी जाणार आहोत. अन्यथा सोमवार पासून मुंबईकडे आगेकूच करणार असल्याचा इशारा लाँग मार्चचे आयोजक माजी आमदार जे. पी. गावित यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आज लेखीपत्र देण्यात आले आहे. लाल वादळ भिवंडी तालुक्याच्या वेशीवर असलेल्या वाशिंदमध्ये दोन दिवसांपासून मुक्कामाला आहे. राज्य सरकारला अल्टिमेट म्हणून याच ठिकाणी लाँगमार्च मध्ये सहभागी असलेल्या हजारो शेतकरी, आदिवासी, भूमिहीन , कष्टकरी यांची तूर्तास पायपीट थांबली होती. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत झालेल्या माहिती माजी आमदार जे. पी. गावित यांनी दिली.

यापूर्वी सरकारने केवळ दिले होते आश्वासन :ते म्हणाले, की आमच्या लाँग मार्चमधील मागण्यांना शिंदे सरकराने ७० टक्के प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आज ठाणे जिल्हा अधिकारी अशोक शिंणगारे यांच्या उपस्थितीत लॉंगमार्च समाप्तीची घोषणा केली आहे. सरकारने केवळ आश्वासन देऊन बोळवण केली होती. त्यामुळे या लाँग मार्चमधील सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय माघारी न जाण्याचा निर्णय घेतला होता असे, माजी आमदार गावित यांनी सांगितले. मात्र शिंदे फडणवीस सरकारकडून आम्हाला न्याय मिळाल्याने आम्ही समाधानी असल्याचे मत गावित यांनी व्यक्त केले आहे.

मार्च थांबविण्याची मुख्यमंत्र्यांनी केली होती विनंती :नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून निघालेला शेतकऱ्यांचा लाॅग मार्चचा आजचा सातवा दिवस होता. तर हा लाॅग मार्च वाशिंदला असताना शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मुंबईत मागण्याविषयी शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली होती. मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन लॉगमार्च स्थगित करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती.

१५ एसटी बस आणि दोन रेल्वे ट्रेनची व्यवस्था :आंदोलनाच्या सातव्या दिवशी जिल्ह्यातील वाशिंदमध्ये धडकलेले लाल वादळ अखेर आज माघारी फिरत आहे. राज्य सरकारच्या वतीने मोर्चेकरांना घरी सोडण्यासाठी १५ एसटी बस आणि दोन रेल्वे ट्रेनची व्यवस्था वाशिंदमधून करण्यात आली आहे. तर शुक्रवारी रात्री कुंडलिक जाधव या शेतकऱ्याचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-Bageshwar Baba in Mumbai बागेश्वर बाबा यांच्या विरोधात मुंबईत तक्रार, अंनिसचे श्याम मानव म्हणाले, पोलिसांनी कारवाई न केल्यास..

Last Updated : Mar 18, 2023, 9:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details