मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर क्षेत्रात कोविड मृत्यचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. इथला मृत्यू दर लपवण्याचा प्रकार ठाकरे सरकार आणि महापालिका करत आहे. माझ्या माहितीप्रमाणे मृत्यू जे आकडे समोर येत आहे त्यात फक्त २० टक्के मृत्यू दाखवले जात आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला.
माजी खासदार किरीट सोमैया यांच्याकडून मीरा भाईंदर महानगरपालिका कोविड रुग्णालयाचा पाहणी दौरा करण्यात आला. यावेळी त्यांनी भाईंदर पूर्वच्या स्व.प्रमोद महाजन कोविड रुग्णालय, अप्पासाहेब धर्माधिकारी व पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर टीका केली.
ठाकरे सरकारवर गंभीर आरोप -
मीरा भाईंदर क्षेत्रात कोविड मृत्यचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. इथला मृत्यू दर लपवण्याचा प्रकार ठाकरे सरकार आणि महापालिका करत आहे. माझ्या माहितीप्रमाणे मृत्यू जे आकडे समोर येत आहे त्यात फक्त २० टक्के मृत्यू दाखवले जात आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार,कल्याण डोंबिवली किंवा मीरा भाईंदर या सगळया क्षेत्रात जानेवारीमध्ये शहरात कोविडमुळे एका रुग्णाचा मृत्यू होत होता तर एप्रिल 12नंतर दररोज २५ मृत्यू होत आहेत. मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येत आहेत त्याचा कंपायजेशन मी करून देत आहे. तसेच वसई महापालिका क्षेत्रात पहिल्या १४ दिवसात कोविडमुळे २०१ मृत्यू झाले मात्र त्यांनी दाखवले २३ मृत्यू आहेत. तर ठाणे महापालिकेत ३६९ मृत्यू झाले मात्र त्यांनी दाखविलेली संख्या ५७ आहे. मीरा भाईंदरमध्ये तीच अवस्था आहे.
महानगरपालिकामध्ये मोठ्या प्रमाणात कोविड घोटाळा -