महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वे स्थानकातच झाली महिलेची प्रसूती; पनवेल स्थानकातील दुसरी घटना - पनवेल रेल्वे स्थानक प्रसूती न्यूज

डॉली सनी नावाची गरोदर महिला केरळमधील एर्नाकुलम येथून दिल्लीला जाणाऱ्या कोविड स्पेशल मंगला एक्सप्रेसमध्ये बसली होती. प्रवासादरम्यान प्रसूती वेदना जाणवल्याने डॉलीला पनवेल रेल्वे स्थानकातील महिला प्रतीक्षागृहात नेण्यात आले. तिथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रसूती करण्यात आली.

Delivery
प्रसूती

By

Published : Aug 16, 2020, 3:41 PM IST

नवी मुंबई - पनवेल रेल्वे स्थानकावरच एका महिलेची प्रसूती झाली. डॉली सनी(वय 25) नावाची ही महिला मंगला एक्सप्रेसने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान प्रसूती वेदना जाणवल्याने या डॉलीला पनवेल रेल्वे स्थानकातील महिला प्रतीक्षागृहात नेण्यात आले. तिथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रसूती करण्यात आली. सध्या बाळ व बाळंतीण दोघेही सुखरूप असून दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखले केले आहे, अशी माहिती पनवेल रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांनी दिली.

गरोदर डॉली केरळमधील एर्नाकुलम येथून दिल्लीला जाणाऱ्या कोविड स्पेशल मंगला एक्सप्रेसमध्ये बसली होती. सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी ही एक्सप्रेस पनवेल स्थानकाजवळ आली. या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या डॉलीला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. याची माहिती 'वन रुपी क्लिनिक'च्या डॉ. विशाल वाणी यांना देण्यात आली. डॉ. वाणी यांनी स्थानकात उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने डॉलीची प्रसूती केली. डॉलीला मुलगी झाली आहे.

पनवेल रेल्वे स्थानकात अशा प्रकारे प्रसूती होण्याची ही दुसरी घटना आहे. या अगोदर 10 महिन्यांपूर्वी नेरुळमध्ये राहणाऱ्या एका महिलेची पनवेल रेल्वे स्थानकात प्रसूती झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details