महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केडीएमटीचा बस चालक डोक्यावर छत्री धरून चालवतोय बस; व्हिडिओ व्हायरल - ठाणे

कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेतील एका बसमध्ये बस चालक चक्क छत्री धरून बस चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  झाला आहे. यामुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याच बसमध्ये प्रवास करणारे इतरही प्रवासीही आपल्या अंगावर पावसाचे पाणी पडू नये, म्हणून छत्री उघडून प्रवास करत होते.

केडीएमटीचा बस चालक एका हातात डोक्यावर छत्री धरून चालवतोय बस ; व्हिडिओ व्हायरल

By

Published : Jun 29, 2019, 10:06 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेतील एका बसमध्ये बस चालक चक्क छत्री धरून बस चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याच बसमध्ये प्रवास करणारे इतरही प्रवासीही आपल्या अंगावर पावसाचे पाणी पडू नये, म्हणून छत्री उघडून प्रवास करत होते.

केडीएमटीचा बस चालक एका हातात डोक्यावर छत्री धरून चालवतोय बस ; व्हिडिओ व्हायरल

महापालिकेच्या परिवहन सेवा गेल्या अनेक वर्षापासून सतत वादग्रस्त राहिली आहे. त्यातच यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच परिवहन सेवेत बसमध्ये छत्री बसवल्याचा व्हिडीओमुळे समोर आला. या बसमधील चालकाच्या अंगावर बसच्या छतातून पावसाच्या पाण्याची धार लागली . तेव्हा त्याने एका हाताने छत्री धरून दुसऱ्या हाताने बस चालवली. तर या बसमध्ये प्रवास करणारे प्रवासीही छत्री उघडून बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

दरम्यान या घटनेमुळे केडीएमटीवर प्रवासी वर्गातून टीकेची झोड उठली असून हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत केडीएमटीचे प्रशासन अधिकारी मारुती खोडके यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details