महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तलावात कचऱ्याचे साम्राज्य; केडीएमसीचे दुर्लक्ष - kdmc waste in the lake

आधारवाडी कारागृह शेजारी असलेल्या दांडेकर तलावात स्थानिकांसह व्यावसायिकांकडून कचरा टाकला जातो. त्यामुळे तलावातील पाणी गढूळ होऊन बिकट अवस्था झाली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनकडे लेखी तक्रारही दिली आहे. मात्र या तक्रारीला पालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचा आरोप स्थानिक तक्रादार नागरिकांनी केला आहे.

thane kdmc lake
तलावांकडे केडीएमसीचे दुर्लक्ष

By

Published : Jan 10, 2021, 12:34 PM IST

ठाणे -आधारवाडी कारागृह शेजारी असलेल्यादांडेकर तलावात स्थानिकांसह व्यावसायिकांकडून कचरा टाकला जातो. त्यामुळे तलावातील पाणी गढूळ होऊन बिकट अवस्था झाली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनकडे लेखी तक्रारही दिली आहे. मात्र या तक्रारीला पालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचा आरोप स्थानिक तक्रादार नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे या तलावात स्थानिक नागरिक विविध धार्मिक विधीसह गणपती आणि देवीचे विसर्जन करतात. त्यावेळी तलावाची साफसफाई करण्यात येते. त्यांनतर मात्र वर्षभर या तलावात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.

तलावांकडे केडीएमसीचे दुर्लक्ष
अनेक तलाव नामशेष होण्याच्या मार्गावरकल्याण डोंबिवली शहरीकरणात अनेक तलाव हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जे तलाव शिल्लक आहेत, त्यांचेही संवर्धन केले जात नाही. त्यामुळे बहुतांशी तलाव कोरडे पडले असून, अनेक तलाव शेवाळ, गाळ, कचरा यांनी भरले आहेत. महापालिकेने गणपती सणाच्या काळात काही तलावांचे सुशोभाकरण केले होते. त्यानंतर मात्र जलसंवर्धनाकडे पालिका प्रशासन आणि सत्ताधार्यांची उदासीनताच दिसून येत आहे. त्यामुळे कल्याणातील अनेक तलाव दुरावस्थेच्या गर्तेत सापडले आहेत. कल्याणमधील काळा (भगवा) तलाव आणि टिटवाळ्यातील महागणपती मंदिर तलावाचे पालिकेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त इतर तलावांना अवकळा आली आहे.भटाळे तलावासह बहुतांश तलावावर भूमाफियांचा डोळागेल्या वर्षीच्या पालिकेच्या पर्यावरण अहवालातून खळबळजनक माहिती उघडकीस आली. तलाव, सरोवर आणि जलाशय ही स्थानिकांची अत्यावश्यक गरज भागवण्याबरोबरच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावतात. मात्र, जलसंवर्धनाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी गौरीपाडा तलावातील गाळ काढण्यात आला आहे. तर दुर्गाडी किल्ल्याच्या समोर असलेल्या भटाळे तलावात भराव टाकून भूमाफियांनी झोपड्या उभारल्या आहेत. महापालिकेने गेल्या पाच वर्षात 10 वेळा येथील अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त केल्या. मात्र आजही याठिकाणी झोपड्या पुन्हा उभारल्या आहेत. शिवाय शेजारील सांडपाणीही तलावात सोडले जात आहे. मात्र, त्यावर पालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नाही. सुशोभीकरण केवळ कागदावरचबल्याणी, टिटवाळा या परिसरातील तलावात गाळ असल्याने साफ करणे गरजेचे आहे. तसेच गौरीपाडा तलाव, उंबर्डे तलाव, डावजे, राहटले तलाव, आधारवाडी जेलजवळील तलाव, पोखरण तलावातील गाळ पालिकेकडून काढण्यात आला आहे. चिंचपाडा, एफ केबीन जवळील तलाव आणि जरीमरी देवी तलावात शेवाळ साचली आहेत. उंबर्डे तलाव, गौरीपाडा, रहाटाळे, सापाड, आधारवाडी, भटाळे, चोळे (डोंबिवली) तलावांचे सुशोभीकरण पालिकेने केले. पण केवळ संरक्षण कठडे आणि गाळ काढण्यापुरतीच मर्यादीत राहिले. तलावांच्या सुशोभीकरणासाठी दरवर्षी पालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येते. मात्र, हा निधी खर्च केला जात नसल्याने सुशोभीकरण केवळ कागदावरच राहिले आहे. तलावात निर्माल्य, प्लास्टिक, पिशव्या आणि कचरा टाकला जात असल्याने अनेक तलाव प्रदूषित झाले आहेत. त्यामुळे तलाव वाचवण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे.कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत 42 तलावकल्याण डोंबिवली पालिका हद्दीत 42 तलावांची नोंद आहे. त्यापैकी अटाळी, आंबिवली गाव, सापाड गाव, चक्की नाका, सोनारपाडा, घेसर तलाव, विजयनगर तलाव या तलावांमध्ये पाणी नाही. त्यामुळे हे तलाव कोरडे पडले आहेत. तर बल्याणी गाव तलाव, मांडा पूर्व तलाव, उंबर्डे तलाव, सापाड गावाबाहेरील तलाव, भटाळे तलाव, दावजे तलाव आधारवाडी जेल तलाव, नांदिवली तलाव, पिसवली तलाव, चिंचपाडा तलाव, मानपाडा तलाव, घेसर तलाव, निळजे तलाव, काटई तलाव, उसरघरतलाव, भोईरवाडी तलाव, चोळेतलाव, आयरे तलाव, विजयनगर तलाव, केापरगाव गावदेवी मंदिरजवळील तलाव या तलावात गाळ आणि मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. त्यामुळे हे तलाव साफ करणे गरजेचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details