महाराष्ट्र

maharashtra

केडीएमसीच्या सुरक्षा रक्षकाला म्यूकरमायकोसिसची लागण, आजारामुळे गमावला डोळा

By

Published : May 30, 2021, 8:30 PM IST

कल्याण डोंबिवली शहरात म्यूकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत असताना आता महापालिका कर्मचाऱ्याला देखील या आजाराची लागन झाली आहे. वेळेत निदान न झाल्याने एका सुरक्षा रक्षकाला आपला डावा डोळा गमवावा लागला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी म्यूकरमायकोसिसमुळे निकामी झालेल्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली.

म्यूकरमायकोसिसमुळे गमावला डोळा
म्यूकरमायकोसिसमुळे गमावला डोळा

ठाणे -कल्याण डोंबिवली शहरात म्यूकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत असताना आता महापालिका कर्मचाऱ्याला देखील या आजाराची लागन झाली आहे. वेळेत निदान न झाल्याने एका सुरक्षा रक्षकाला आपला डावा डोळा गमवावा लागला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी म्यूकरमायकोसिसमुळे निकामी झालेल्या डोळ्यावर वेळीच शस्त्रक्रिया करून डोळा काढला. त्यामुळे त्यांच्या शरीराचे इतर महत्त्वाचे अवयव आणि त्यांचा जीव वाचला. मात्र मार्च महिन्यापर्यंत आपल्या दोन्ही डोळ्यासह पालिकेत ड्युटी करणाऱ्या या कर्मचाऱ्याला आता या दिव्यांगत्वासोबत जगावे लागणार आहे.

कोरोनावर केली होती मात

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय शाखेत मागील 25 वर्षांपासून संजय निकम हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. 3 एप्रिल २०२१ रोजी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना महापालिकेच्या आर्ट गॅलरी कोविड कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात 9 दिवस उपचार घेऊन ते 11 एप्रिल रोजी घरी परतले. परंतु 14 एप्रिल रोजी त्यांना प्रचंड डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी शास्त्रीनगर रुग्णालय गाठले. मात्र या रुग्णालयातील बाह्य ओपीडी बंद करून हे रुग्णालय करोना रुग्णालय म्हणून चालविले जात असल्यामुळे त्यांना रुग्णालयात कान, नाक, घसा तज्ज्ञ उपलब्ध होऊ शकले नाहीत. यानंतर भीतीने त्यांनी तातडीने खासगी रुग्णालय गाठले डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना म्यूकरमायकोसिस आजाराची लागण झाल्याचे निदान केले. म्यूकरमायकोसीस आजारामुळे त्यांना आपला डोळा गमवावा लागला आहे.

केडीएमसीच्या सुरक्षा रक्षकाला म्यूकरमायकोसिसची लागण, आजारामुळे गमावला डोळा

उपचाराचा खर्च देण्याची मागणी

डोळ्याची शस्त्रक्रिया टाळल्यास संभाव्य धोक्याची कल्पना त्यांना डॉक्टरांनी दिल्याने, त्यांनी तातडीने आपले मूळ गाव सोलापूर गाठत तिथे खासगी रुग्णालयात डोळ्यावर शस्त्रक्रिया केली. यानंतर आपल्या आजाराची कल्पाना त्यांनी वरिष्ठांना दिली आहे. तसेच त्यांनी मदतीची देखील मागणी केली आहे. त्यांना या शस्त्रक्रियेसाठी 2 लाखांचा खर्च आला आहे.

हेही वाचा -बिहार : रुग्णवाहिका उद्घाटन वादप्रकरणी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीवर दहा पानांचा एफआयआर दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details