ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी आज दुपारी साडे अकरा वाजता पालिका मुख्यालयातील विविध विभागात अचानक पाहणी केली. यावेळी त्यांना बहुतांश अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा लेटलतीफपणा सुरूच असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे.
५ दिवसांचा आठवडा, तरीही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा लेटलतीफपणा सुरूच, कल्याण-डोंबिवली पालिकेतील चित्र हेही वाचा -आता पालिका कर्मचाऱ्यांनाही ५ दिवसांचा आठवडा, आयुक्तांच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी
शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी १ मार्च पासून राज्यात ५ दिवसांचा आठवडा आणि २ दिवस सुट्टी असा आठवडा ठरल्यानंतर कामगार संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. २ दिवसांच्या सुट्टीमुळे कामाच्या दिवसात कामाचे वेळापत्रक वाढविण्यात आले आहे. तरी पण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लेटलतीफपणा सुरूच आहे. तीन दिवसापूर्वीच केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सवर्च विभागांना कामकाजाचे एक वेळापत्रक काढले आहे.
आज सकाळी जेव्हा आयुक्त केडीएमसी मुख्यालयात आले. त्यावेळी त्यांनी सर्व विभागांची पाहणी केली. यावेळी बहुतांश अधिकारी-कर्मचारी कार्यलयात गैरहजर असल्याचे त्यांना दिसून आले. विशेष म्हणजे पालिकेच्या प्रमुख अधिकारी गैरहजर असल्याचे पाहून आयुक्त हैराण झाले. आता आयुक्तांच्या अचानक पाहणीवेळी आपल्या वेळेनुसार न येणाऱ्या लेटलतीफांवर आयुक्त काय कारवाई करणार याकडे महापालिकेतील साडे सहा हजार अधीकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -'कॅग' अहवालावरून आज विधानसभेत राडा होण्याची शक्यता