महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काशिमीरा पोलीस ठाणे : पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू... - कोरोना व्हायरस बातमी

काशिमीरा पोलीस ठाण्यातील या अधिकाऱ्यासह इतर 8 जणांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

kashimira-police-station-inspector-dies-due-to-corona
पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू...

By

Published : Jun 24, 2020, 12:40 PM IST

Updated : Jun 24, 2020, 1:05 PM IST

मिरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर शहारातून पोलीस खात्यासाठी अतिशय दुर्दैवी बातमी समोर आली आहे. काशिमीरा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोमुळे मृत्यू झाला आहे.

काशिमीरा पोलीस ठाण्यातील या अधिकाऱ्यासह इतर 8 जणांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या संकट काळात आपले कर्तव्य बजावत असताना, पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. मीरा भाईंदमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला मुंबईच्या सेवन हिल्स रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.

Last Updated : Jun 24, 2020, 1:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details