ठाणे -अंबरनाथ शहरातील एका कराटेपटूने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये खास विक्रमाची नोंद केली आहे. कराटे प्रकारातील 'चुदान झुकी' म्हणजेच छातीच्या स्तरावर एका मिनिटात तब्ब्ल २१७ पंच मारून त्याने हा विक्रम प्रस्थापित केला. रोहित भोरे असे या कराटेपटूचे नाव आहे.
अंबरनाथच्या कराटेपटूची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद - रोहित भोरे अंबरनाथ लेटेस्ट न्यूज
लिम्का बुक रेकॉर्डसाठी रोहितला एका मिनिटात १५० ठोसे मारायचे होते. यासाठी अनेक दिवसांपासून तो सराव करीत होता. मात्र त्याने त्याही पुढे जाऊन २१७ ठोसे लगावले आहेत. आतापर्यंत कराटे प्रकारातील लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमधील हा पहिला विक्रम असल्याचे रोहित सांगतो.
हेही वाचा -साडे सहा अब्ज रूपयांचं उत्पन्न!..'हा' आहे फुटबॉलविश्वातला सर्वात श्रीमंत क्लब
लिम्का बुक रेकॉर्डसाठी रोहितला एका मिनिटात १५० ठोसे मारायचे होते. यासाठी अनेक दिवसांपासून तो सराव करत होता. मात्र त्याने त्याही पुढे जाऊन २१७ ठोसे लगावले आहेत. आतापर्यंत कराटे प्रकारातील लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमधील हा पहिला विक्रम असल्याचे रोहित सांगतो. यावेळी अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. विक्रमाची नोंद झाल्यावर सगळ्यांनी रोहितचे कौतुक केले. आता पुढे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी तयारी करणार असल्याचे रोहितने सांगितले आहे.