ठाणे -कल्याण पूर्वेतील मलंग रोड ते उल्हासनगर हद्दीपर्यंत १०० फुट रस्त्यात बाधित होणारी ४२ (खोल्या) बांधकामे निष्कासित करण्याची धडक कारवाई कल्याण डोंबिवली महापालिकेने केली. या कार्याद्वारे महापालिकेने रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा केला.
हेही वाचा -मुरबाड - माळशेज रोडवर कार आणि दुचाकीमध्ये अपघात; १ विद्यार्थी ठार, तर ४ गंभीर
३० मीटर रस्त्यात बाधित होणारी बांधकामे निष्कासित
केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ५/ड प्रभाग क्षेत्र परिसरात, कल्याण पूर्वेतील मलंग रोड ते उल्हासनगर हद्दीपर्यंत ३० मीटर रस्त्यात बाधित होणारी बांधकामे निष्कासित करण्याची धडक कारवाई प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, उप अभियंता प्रशांत भुजबळ यांनी ५/ड व ४/जे प्रभागातील अतिक्रमण विरोधी पथकामार्फत व महानगरपालिकेच्या पोलीस पथकाच्या सहकार्याने केली.