महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवलीवर 551 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

हवामान विभागाने तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर 'केडीएमसीची' सिटी कंट्रोल रूम सज्ज झाली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात महापालिकेच्या वतीने 551 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात कुठेही पाणी साचलं, झाडे कोसळली अथवा एखादी दुर्घटना घडली तर कट्रोल रूममधून त्याची माहिती तातडीने संबंधित विभागाला देण्यात येणार आहे.

By

Published : Jun 12, 2021, 8:40 PM IST

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवलीवर 551 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवलीवर 551 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

ठाणे -हवामान विभागाने तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर 'केडीएमसीची' सिटी कंट्रोल रूम सज्ज झाली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात महापालिकेच्या वतीने 551 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात कुठेही पाणी साचलं, झाडे कोसळली अथवा एखादी दुर्घटना घडली तर कट्रोल रूममधून त्याची माहिती तातडीने संबंधित विभागाला देण्यात येणार आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवलीवर 551 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

स्मार्ट सिटी नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा

सकाळपासूनच कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. सुरक्षीततेसाठी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार हे शहरातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शहरात ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या 551 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पावसाचा आढावा घेतला जात अल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पवार यांनी दिली. पवार हे स्वतः स्मार्ट सिटी नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुनील पवार यांनी केले आहे.

हेही वाचा -पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत 21 तारखेनंतर भूमिका जाहीर करणार - ऊर्जामंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details