महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivsena : बहुजन समाज पार्टीच्या माजी नगरसेवकाचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश - bahujan samaj party corporator and workers join shivsena

कल्याण डोंबिवली महापालिकेतील सेनेचे ४० नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यातच कल्याण पूर्वेतील आनंद नगर भागातील बहुजन समाज पार्टीचे माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला ( bahujan samaj party corporator and workers join shivsena ) आहे.

bahujan samaj party corporator and workers join shivsena
bahujan samaj party corporator and workers join shivsena

By

Published : Jul 10, 2022, 5:38 PM IST

ठाणे -महाराष्ट्र राज्यातील सत्तांतरणानंतर शिवसेना पक्षातील दोन गटात शह काटशहाच्या राजकारणात कल्याण डोंबिवली महापालिकेतील सेनेचे ४० नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यातच कल्याण पूर्वेतील आनंद नगर भागातील बहुजन समाज पार्टीचे माजी नगरसेवक रामभाऊ भाऊ ओव्हाळ यांनी मातोश्री वर जावून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले. तसेच, आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला ( bahujan samaj party corporator and workers join shivsena ) आहे.

शिवसेनेत प्रवेश करण्याची व्यक्त केली इच्छा -राज्यातील सत्तांतरणानंतर शिवसेना पक्षातून जाणाऱ्यांची कसल्याही प्रकारे मनधरणी न करता पक्ष संघटन पुन्हा एकदा मजबूत करण्याचे आवाहन करणारे उद्धव ठाकरेंनी केले. त्यानंतर कल्याण पूर्वेतील आनंद नगर भागातील बीएसपीचे माजी रामभाऊ ओव्हाळ यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह (आज) शनिवारी सदिच्छा भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. या समयी उद्धव ठाकरे यांनी राम ओव्हळ यांच्या हातात भगवा ध्वज देऊन त्यांचे शिवसेना पक्षात प्रवेश देत स्वागत केले.

"पक्षात आपला सदैव मान सन्मान राखला जाईल" -यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, आजच्या संकट समयी आपण माझ्यावर विश्वास टाकून पक्षात प्रवेश केलात. त्याबद्दल मनापासून आभार. पक्षात आपला सदैव मान सन्मान राखला जाईल. या वेळी कल्याणचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, सह संपर्क प्रमुख रमाकांत देवळेकर, माजी आमदार सुभाष भोईर, माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, देवळेकर, उल्हासनगर महापालिकेचे माजी नगरसेवक धनंजय बोडारे, शाखा प्रमुख विवेक बर्वे, प्रकाश जाधव आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा -Aaditya Thackeray : 'माझ्यावर उगाच खास प्रेम करण्याची...'; अपात्रतेच्या नोटीसीवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details