ठाणे -कळवा पूर्व येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. प्रभू सुदाम यादव (वय 45 वर्षे), विद्धवतीदेवी प्रभू यादव (वय 40 वर्षे), रवीकिशन यादव (वय 12 वर्षे), सीमरन यादव (वय 10 वर्षे), संध्या यादव (वय 3 वर्षे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
जखमींवर मोफत उपचार
तसेच, जखमींवरही मोफत उपचार केले जाणार असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. प्रिती यादव (वय 5 वर्षे) आणि आचल यादव (वय 18) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्येकी 5 लाखांची मदत