महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Geeta Jain Assault Case : आमदार गीता जैन विरोधातील कनिष्ठ अभियंत्याची तक्रार मागे

20 जून रोजी मीरा-भाईंदर विधानसभेच्या भाजप समर्थक आमदार गीता जैन यांनी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांच्या कानशिलात लगावली होती. या संदर्भात शुभम पाटील यांनी 21 जून रोजी काशिमीरा पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन जैन यांच्यावर तक्रार दिली होती. मात्र, सोमवारी शुभम पाटील यांनी ही तक्रार मागे घेतल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन तसेच जैन यांच्या संगमताने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न दिसुन येत आहे.

Geeta Jain Assault case
Geeta Jain Assault case

By

Published : Jun 27, 2023, 5:50 PM IST

भाईंदर(ठाणे) : मिरा भाईंदर विधानसभेच्या भाजप समर्थक आमदार गीता जैन यांनी २० जून रोजी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांना कानशिलात लगावली होती. याप्रकरणी शुभम पाटील यांनी २१ जूनला काशिमिरा पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, सोमवारी शुभम पाटील यांनी सदर तक्रार आपण मागे घेतली आहे, असे पत्र दिले आहे. तक्रार मागे घेण्यासाठी गीता जैन यांचा दबाव असल्याचे बोलले जात आहे.

आमदार गीता जैन विरोधातील तक्रार मागे

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न :गीता जैन यांच्या मारहाणीच प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं कृत्य करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर सोमवारी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. तात्काळ संबंधित ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, आठ दिवस उलटले असताना जैन यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. जैन सत्ताधारी पक्षाच्या आमदार असल्याने राजकीय दबावापोटी हे प्रकरण सुरुवातीपासून दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जैन यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे :सोमवारी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन गीता जैन यांच्या विरोधात पालिका प्रशासनाकडून का गुन्हा दाखल करण्यात येत नाही. संबंधित कनिष्ठ अभियंता शुभम पाटील भाजप पुरस्कृत कामगार संघटनेचा सदस्य असून, गुन्हा दाखल नाही झाला तर लवकरच संघटनेची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मेहता यांनी सांगितले होत. भविष्यात आयुक्तांना देखील कानशिलात लगावली तर, गुन्हा दाखल होणार नाही का? असा प्रश्न मेहता यांनी उपस्थित केला. परंतु मेहता यांच्या संघटनेचे सदस्य कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांनीच जैन यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

संगनमताने या प्रकरणाला पूर्णविराम :सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आमदार गीता जैन यांच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंता शुभम पाटील, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी भेट घेतली. पालिका प्रशासन, जैन यांच्या संगनमताने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे असे बोलले जात आहे.

हेही वाचा -MLA Geeta Jain : आमदार गीता जैन यांनी मनपा अभियंत्याच्या लगावली कानशिलात, निलंबित करण्यासाठी दिले पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details