महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Burglary case : पत्रकाराला लागला डान्सबारचा नाद, घरफोडी प्रकरणात पत्रकार रोशन जाधवला अटक - खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

डान्सबार मधील बारबालांवर नोटाची उधळण करून मजा करण्याच्या नादात प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रात काम करणारा पत्रकार अट्टल घरफोड्या बनल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे डान्सबारमधील बारबालांची हौस पूर्ण करण्यासाठी एक उच्चशिक्षित पत्रकाराने घरफोडीचा मार्ग निवडल्याने पोलीसही चक्रावून गेले. रोशन जाधव (वय ३२, रा. डोंबिवली ) असे घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या पत्रकाराचे नाव आहे.

Burglary case
Burglary case

By

Published : Apr 12, 2023, 7:05 PM IST

Updated : Apr 12, 2023, 7:14 PM IST

उच्चशिक्षित पत्रकाराने निवडला घरफोडीचा मार्ग

ठाणे : पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेतले, नोकरीही लागली, मात्र याच दरम्यान डान्सबारमधील बारबालांचे व्यसन जडले. हौस पूर्ण करण्यासाठी एक उच्चशिक्षित पत्रकाराने घरफोडीचा मार्ग निवडल्याने पोलिसही चक्रावून गेले. रोशन जाधव (वय ३२, रा. डोंबिवली ) असे घरफोडीच्या गुन्हा अटक केलेल्या पत्रकाराचे नाव आहे. महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या तरुणाला अखेर खडकपाडा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. त्याचे 8 गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत. रोशन हा डोंबिवलीतील निलजे गावचा रहिवासी आहे. या तरुणाने पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेतले असून काही वर्षांपासून तो एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात काम करत होता. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहने परिसरात घरफोडी करून अज्ञात आरोपींनी सुमारे 35 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.

चोरीच्या घटनात वाढ : याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गेल्या महिनाभरापासून या परिसरात घरफोडी, चोरीच्या घटना सातत्याने घडत असून, त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. परिसरात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला सापळा रचून अटक केली होती. या इसमाकडे चौकशी केली असता त्याने ठाणे जिल्ह्यातील मोहने, आंबिवली, टिटवाळा, शहापूर परिसरात दिवसा घरफोडी, चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. तसेच आरोपी हा रोजचा घरफोडी करणारा चोर असून एकटाच इमारतीत घुसून दिवसा घरफोडी करत असे.

चोरीचे साहित्य जप्त : पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नमूद गुन्ह्याच्या तपासात एकूण 8 गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये 47 तोळे (470 ग्रॅम) सोन्याचे दागिने, 1 लॅपटॉप, 1 मोबाईल फोन, दोन महागडी घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि अनिल गायकवाड, तपास पथकाचे अंमलदार सहा. पो.उप. निरी. मधुकर दाभाडे, जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, पोहवा अशोक पवार, नवनाथ डोंगरे, जितेंद्र सरदार, संजय चव्हाण, राजु लोखंडे, संदिप भोईर, योगेश बुधकर, सुधीर पाटील, पोशि राहुल शिंदे, अनंत देसले, कुंदन भांबरे, अविनाश पाटील यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा - Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांसह सीए महेश गुवरव यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

Last Updated : Apr 12, 2023, 7:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details