महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात भविष्यात संधी मिळेल' - Thane latest news

आघाडीच्या विजयात आणि पराभवात त्यांची साथ कधी सोडली नाही. त्यामुळे भविष्यात सत्ता वाटपाच्या वेळी आम्हाला संधी दिली गेली पाहिजे, अशी इच्छा कवाडे यांनी व्यक्त केली.

Jogendra Kawade
जोगेंद्र कवाडे

By

Published : Jan 1, 2020, 8:24 AM IST

ठाणे- महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्र पक्ष म्हणून आम्हाला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नसले तरी भविष्यात ही संधी मिळेल अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया पीपल रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांनी दिली. ठाण्यात एका खासगी कार्यक्रमात कवाडे आले असता, त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

जोगेंद्र कवाडे, अध्यक्ष, पीपल रिपब्लिकन पार्टी

हेही वाचा - ठाणेकरांची मासुंदा तलावावर गर्दी, नववर्षाचे जल्लोषात स्वागत

यावेळी बोलताना ते म्हणाले, आघाडीच्या विजयात आणि पराभवात त्यांची साथ कधी सोडली नाही. त्यामुळे भविष्यात सत्ता वाटपाच्या वेळी आम्हाला संधी दिली गेली पाहिजे. कोरेगाव-भीमा घटना ही दंगल नसून दलित आणि बौद्धांवर हल्ला होता. त्याला सरकारची फूस होती, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा -संशयातून प्रेयसीची हत्या; प्रियकराला जन्मठेप

दुसरीकडे रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. आठवले यांना कोणती भूमिका घ्यायची असेल, तर ती मोदी आणि अमित शाह यांना विचारून घ्यावी, लागेल असा टोला देखील त्यांना लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details