ठाणे- सनातनाशी संबंध असेल तर काँग्रेसने रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील लोकसभेचा उमेदवार बदलावा. माझा विरोध काँग्रेसच्या उमेदवाराला नाही. पण, तो ज्या व्यासपीठावर दिसतो ते सर्व आक्षेपार्ह आहे. तो जर सनातनशी संबधीत असेल तर ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या हिताचे नाही, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसचे वादातीत उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांच्याबद्दल व्यक्त केले.
सनातनशी संबधावरुन काँग्रेस उमेदवाराचा जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विरोध
काँग्रेसने बांदिवडेकरांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. सनातनशी संबध असल्याच्या आरोपांमुळे ते अडचणीत आले आहेत.
काँग्रेसने बांदिवडेकरांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. सनातनशी संबध असल्याच्या आरोपांमुळे ते अडचणीत आले आहेत. बांदिवडेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समाज माध्यमांवर देखील त्यांच्यावर टीका होत आहे. सनातनशी संबधीत कार्यक्रमात उपस्थित असलेले त्यांचे काही फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. या पार्श्वभुमीवर जितेंद्र आव्हाड यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरवरुन देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान बांदिवडेकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपला सनातनशी कसलाही संबध नसल्याचे कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्ट केले आहे.