ठाणे -'बाबुल की दुआएँ लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले, मैके की कभी न याद आए, ससुराल में इतना प्यार मिले', हे गाणे मिश्किल शैलीत गाऊन आघाडीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचे निवडणुकीच्या मैदानात स्वागत केले.
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून आव्हाड आणि सय्यद एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. गुरुवारी वेळे अभावी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न करू शकल्याने आव्हाडांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेने रातोरात शिवबंधन बांधून दीपाली सय्यद या मराठी अभिनेत्रीला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उभे केले.