ठाणे -शरद पवार यांनी बाप बदलला नाही तर ते स्वत: बाप झाले अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे गणेश नाईकांना प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी नाईक यांना आम्ही बाप बदलण्यामधील नाहीत, अशी टीका केली होती. यावर नाईकांनी शरद पवार यांनीही पक्ष बदलले होते, त्यांनीही मग बाप बदलला अशी टीका केली होती. त्यावर आव्हाड यांनी आज पुन्हा विषय तापवला आहे.
"शरद पवारांनी बाप बदलला नाही तर ते स्वत: बाप झाले" हेही वाचा - मध्यप्रदेशसारखा आनंद महाराष्ट्र भाजपला शक्य नाही - धनंजय मुंडे
आव्हाड यांचे नाईकांना या शब्दात प्रत्यूत्तर -
आव्हाड म्हणाले, 1977 आणि 1999 ला पक्ष काढला आणि तुमच्यासारखे 60 ते 70 आमदार निवडून आणले. माझ्यासारख्या गरीबाच्या मुलाला इथपर्यंत आणलं कारण ते बाप झाले म्हणून. त्यामुळे आज तुमच्या विधानावरुन तुम्ही दाखवून दिलेत की, तुम्ही कृतघ्न आहात आणि हे मी पुराव्यानिशी आगरी समाजाला दाखवून देणार आहे. तुम्ही आगरी समाजाच्या कधी पाठीशी उभे राहिला नाहीत तुम्ही कधी नवी मुंबईतील गावांच्या पुनर्सिमांकनासाठी पुढे आला नाहीत. कायदा दाखवून नेहमी पळ काढला जे तुम्ही केले नाही ते मी करुन दाखवणार, अशा शब्दात नाईक यांना आव्हाड यांनी सुनावले आहे.
नवी मुंबईमध्ये एवढ्या अडचणीत आहे पण त्यांवर कधी भाष्य केले नाही. मात्र, स्वत:च्या राजकीय हेतू साध्य व्हावा म्हणून तुम्ही मुलाचाही बळी दिला असल्याचे आव्हाड म्हणाले. तुम्हाला तुमच्यावर केलेल्या उपकारांची मग ते नवी मुंबईकरांनी असो, आगरी समाजाने असो, बाळासाहेबांनी असो की शरद पवारांनी असो त्याची जाणीव तुम्हाला नसते. कारण तुम्ही कृतघ्न आहात हे तुम्ही तुमच्या विधानांवरुन स्पष्ट केले. कुठल्या तरी फडतूस सिनेमाचा डायलॉग मारुन बाप तुम्ही काढला होतात मी नाही याची ही आठवण करुन देतो, असे बोलत पुन्हा एकदा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर तोफ डागली आहे.