ठाणे Jitendra Awhad On Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील शाखेवरून वाद सुरू आहे. यावरुन शिंदे विरुद्ध ठाकरे गट समोरासमोर आले आहे. त्यामुळंच ठाकरे गटाकडून शाखा ताब्यात घेतल्याचा आरोप वारंवार होत आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मुंब्रा दौऱ्यावर आले आहेत. राजन विचारे, खासदार संजय राऊत, महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र आव्हाड, महाविकास आघाडीतील काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
144 ची नोटीस कोणी दिली? :उद्धव ठाकरे यांना पोलिसांनी पाठवलेली कलम 144 नोटीस रद्द केल्यानंतर राष्ट्रवादीचे मुंब्य्रातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “144 ची नोटीस मागं घेतल्याबद्दल मी ठाणे पोलीस आयुक्तांचं अभिनंदन करतो. आजवर माजी मुख्यमंत्र्यांना 144 ची नोटीस कोणी दिली? मुंब्य्रात पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे मुंब्य्रात येऊन गेले असते, मात्र गेल्या 12 तासांपासून हा मुद्दा उपस्थित केला गेला." कोणतीही गरज नसताना हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
144 अंतर्गत बजावलेले नोटीस रद्द : ठाण्यातील शाखेवरून ठाकरे गट, शिंदे गटात वाद सुरू आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या ठिकाणी येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी नोटीसही बजावली होती. त्यांना मुंब्रात येण्यापासून रोखण्यासाठी कलम 144 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर वातावरण तापलं होतं. आता हा वाद चिघळू नये, म्हणून पोलीस प्रशासनानं संयमाचं धोरण अवलंबलं आहे. पोलिसांनी नोटीस रद्द केली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी स्थानिक शिवसैनिकांशी भेट घेतली .