ठाणे - दिवसाढवळ्या जर लोकशाहीची हत्या होईल असे कुणाला वाटत असेल, तर निश्चितच महाराष्ट्र पेटेल, तेव्हा राष्ट्रपती राजवटीचा डाव विसरा. महाराष्ट्रात सत्तेसाठी सुरू असलेला अट्टाहास पाहता राष्ट्रपती राजवटीच्या शक्यतेबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली.
जितेंद्र आव्हाडांची जळजळीत टिका हेही वाचा - मुख्यमंत्री हा फक्त आणि फक्त शिवसेनेचाच होणार - संजय राऊत
आव्हाड म्हणाले, महाभारतातला संजय हा रणांगणातील वृतांत सांगत होता. तसाच प्रकार महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचा इतिवृत्तांत संजय राऊत सांगत आहेत. तेव्हा महाभारतातला संजय आणि महाराष्ट्रातील शिवसेनेचा संजय असे तुलनात्मक ट्विट आव्हाड यांनी केले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये भाजप सगळे काही सांगू शकते. मात्र, शरद पवारांवर नजर ठेवण्यात भाजप अयशस्वी झाला आहे. असे म्हणत आव्हाड म्हणाले, पवार साहेबांची स्टॅटेजी भाजप पकडू शकले नाहीत. उद्या महाराष्ट्रात काय घडणार हे केवळ एकच माणूस सांगू शकतो ते म्हणजे शरद पवार. असा दावाही आव्हाड यांनी केली.
हेही वाचा - सत्ता स्थापनेचा घोळ घालून अप्रत्यक्ष सरकार हाकणे घटनाविरोधी, सामनातून मुख्यमंत्र्यावर टीका