महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Barsu Refinery Project: ही तर राक्षसी राजवट, बारसूतील लाठीचार्जमुळे जितेंद्र आव्हाड यांचा संताप - उद्या ग्रामस्थ प्रकल्प जाळतील

आपल्या हौसेखातर खारघरमध्ये १४ बळी घेण्यात आले. आता रिफायनरी नको म्हणून बारसू पंचक्रोशीतील सर्वच गावे भांडत आहेत. तरीही लाठीचार्ज, अश्रूधूर असे प्रकार केले जात आहेत. ही तर राक्षसी राजवट आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.

Barsu Refinery Project
बारसूतील लाठीचार्जमुळे जितेंद्र आव्हाड यांचा संताप

By

Published : Apr 28, 2023, 6:25 PM IST

जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला

ठाणे: बारसू येथील रिफायनरीला विरोध करण्यासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणार्‍यांवर आज लाठीचार्ज करण्यात आला. या संदर्भात पत्रकारांनी जितेंद्र आव्हाड यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. जो काय प्रकार सुरू आहे. महाराष्ट्र हे सर्व बंद नव्हे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. ही दादागिरी महाराष्ट्र सहन करणार नाही. कारण आज बारसूतील ग्रामस्थांवर जी वेळ आलीय ती उद्या आपल्यावरही येणार आहे. या आंदोलनात सत्यजित चव्हाण यांस अटक करण्यात आली आहे. या आंदोलकांचे नशिब की त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाचा ठपका ठेऊन त्यांच्यावर अद्याप देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही. जास्त दांडगाई जनता सहन करत नाही, हेच या सत्ताधाऱ्यांना समजत नाही.


गरिबांच्या जीवाची पर्वाच नाही: कोणताही प्रकल्प रेटून नेता येत नाही. शरद पवार यांनी चर्चेने हा प्रश्न मार्गी लावावा, असे म्हटले होते. पण, या सरकारला हृदय नाही. महिलांना मारहाण केली जात आहे. ही विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. सत्तेचा अहं योग्य नाही. स्थानिकांना जर हा प्रकल्प नको असेल तर जुलूम का ? आज लाठीचार्ज करून मोजमाप कराल. उद्या गोळीबारही करतील. गरिबांच्या जीवाची पर्वाच नाही. गरीबांचा जीव गेला तरी त्यांना फरक पडत नाही. गरीब मेल्यानंतर लाकडे सरकार पुरवेल. या सरकारने हे ध्यानात ठेवावे की, आज गवत जाळले आहे, उद्या ग्रामस्थ प्रकल्प जाळतील, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.

पोलिसांनी आंदोलकांवर केला लाठीचार्ज: बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासूनचा विरोध आज (28 एप्रिल) शिगेला पोहोचला आहे. माती सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी विरोध करत आंदोलन सुरू केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचे दिसून आले. मात्र, लाठीचार्ज झाला नसल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

हेही वाचा: Case Against Jitendra Awhad जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ कळव्यात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details