महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांचा छळ केल्याचा बदला जनता घेईल, जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हजर होते.

जितेंद्र आव्हाड

By

Published : Oct 3, 2019, 4:37 PM IST

ठाणे- पोटच्या पोरांसाठी एका बापाने जे करावे, ते सर्व शरद पवारांनी माझ्यासाठी केले आहे, असे बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हजर होते.

जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर

हेही वाचा - शरद पवारांचे सारथी झाले जितेंद्र आव्हाड

यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले, वयाच्या 80 व्या वर्षी ज्या इर्षेने आणि जिद्दीने शरद पवार जनतेमध्ये वावरत आहेत, त्याला तोड नाही. गेल्या काही दिवसात आपले खंदे नेते आपल्याला सोडून भाजपवासी झाले याचे दुःख पचवून हा माणूस खचून न जाता जनतेच्या भल्यासाठी उभा महाराष्ट्र पिंजून काढतोय, हे पाहून मन भरून येते, असे आव्हाड म्हणाले.

हेही वाचा -विद्यार्थीनीच्या परदेशात उच्च शिक्षणासाठी पोलीस बंदोबस्तात एनओसी

तब्बल 3 तास रणरणत्या उन्हात उभे राहून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचा अर्ज भरण्यासाठी शरद पवार आले. हे पाहून आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते भावूक झाले. मागच्या 2 महिन्यांत ज्यांनी-ज्यांनी शरद पवारांना त्रास दिला आहे. त्यांना जनता धडा शिकवेल, असा विश्वासही आव्हाडांनी व्यक्त केला. शरद पवार यांच्यासोबत कन्हैया कुमार हे देखील या रॅलीमध्ये सहभागी होते.

ABOUT THE AUTHOR

...view details