महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज; आज येणार निकाल

राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. (Molestation Case On Jitendra Awhad). मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 नुसार त्यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे.

Jitendra Awhad
Jitendra Awhad

By

Published : Nov 14, 2022, 7:53 PM IST

Updated : Nov 15, 2022, 2:18 PM IST

ठाणे - राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अटक टाळण्यासाठी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. (Jitendra Awhad filed anticipatory bail plea). याप्रकरणी सुनावणी झाली आहे. न्यायालय आज निकाल देणार आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान न्यायालय निर्णय देईपर्यंत आव्हाड यांना अटक करु नये असे न्यायालयाने आदेश दिल्याचे वृत्त आहे.

आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा :राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदारजितेंद्र आव्हाड यांच्यावर महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. (Molestation Case On Jitendra Awhad). मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 नुसार त्यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे. मुंब्रा येथील कळवा, ठाणे शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेदरम्यान जितेंद्र आव्हाड याने आपला विनयभंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

यापूर्वीही गुन्हा दाखल :'हर हर महादेव' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह बाबी आढळल्याचा दावा करीत त्या आधारे या चित्रपटाला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह ऐतिहासिक बाबी काढून टाकाव्या यासाठी त्यांनी ठाणे शहरातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहातील एक शो देखील बंद पाडला होता. त्या संदर्भात त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्या गेला आहे.

Last Updated : Nov 15, 2022, 2:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details