महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमळनेरमधील प्रकार महाराष्ट्रातील राजकारणाला मलिन करणारा - जितेंद्र आव्हाड - amelner bip

अमळनेरमधील जी दृश्य समोर येत आहेत, ती महाराष्ट्राच्या राजकारणाला डाग लावणारी आणि मलिन  करणारी आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका.

जितेंद्र आव्हाड

By

Published : Apr 11, 2019, 12:04 AM IST

ठाणे- अमळनेरमधील जी दृश्य समोर येत आहेत, ती महाराष्ट्राच्या राजकारणाला डाग लावणारी आणि मलिन करणारी आहेत. भाजपने जे सूड आणि द्वेषाचे राजकारण केले ते त्यांच्याकडेच फिरुन येत आहे. जे त्यांनी विरोधकांबाबत पेरलं ते त्याच्याच घरात उगवून येत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली.

जितेंद्र आव्हाड


कुठे गेले भाजपचे संस्कार, कुठे गेला वेगळा पक्ष. भाजपला दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहायची सवय आहे, आणि त्याचे प्रमुख हे गिरीष महाजन असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला. राष्ट्रवादी पक्षामध्ये असे सूड आणि द्वेषाचे राजकारण नाही. शरद पवारांनी कधीच असे संस्कार केले नाहीत. वैचारिक सन्मान आणि विरोध झाला पाहिजे, असे ते म्हणाले. भाजपचे अडवाणी यांनीही राजकारणात द्वेष असू नये, असे सांगितल्याची त्यांनी आठवण करुन दिली.


जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी जिल्ह्यातील अमळनेर येथे आयोजित युतीच्या मेळाव्यात भाजप पदाधिकारी एकमेकांत भिडले. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की झाली. या घटनेवर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली.

ABOUT THE AUTHOR

...view details