ठाणे- महाराष्ट्र आणि माझ्या मतदार संघाचे राजकारण वेगळे आहे. पाच वर्ष सतत जनसपंर्क असून महत्वाचे म्हणजे संपूर्ण क्षेत्राचा केलेला विकास ही जमेची बाजू आहे. सत्ताधाऱ्यांनीही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
गेल्या आठवड्यात अजित पवार यांच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर बोलताना त्यांनी भावुक होणे हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे. शेवटी ती माणसे आहेत, एखाद्याला किती त्रास द्यायचा याला मर्यादा आहेत. अजित पवारांना पाच वर्ष त्रास दिला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार ईडीमुळे भावुक नाहीत. मात्र, जी बंडाळी झाली त्याने भावुक झाल्याचे ते म्हणाले. जी मंडळी राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेली आहे, त्यावर बोलताना काळ सगळ्यांवर सूड घेतो, असे बोलून त्यांनी अधिक प्रतिक्रिया देणे टाळले.