ठाणे - हा देश जेवढा तुझ्या बापाचा, तेवढाच माझ्याही बापाचा आहे, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला लगावला. आपल्या घरी संविधान आणून ठेवा. कोणी तुमच्या ओळखीसाठी कागदपत्रे मागितले तर तुम्ही कागदपत्रे दाखवू नका, त्याऐवजी संविधानाची प्रत दाखवा, असे आवाहन आव्हाड यांनी केले.
'हा देश जेवढा तुझ्या बापाचा, तेवढाच माझ्याही बापाचा' - जितेंद्र आव्हाडांची मोदी सरकारवर टीका
एनआरसी, सीएए, एनपीआर या कायद्याविरोधात गेल्या ११ दिवसापासून कल्याणच्या केडीएमसी मैदानावर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल (शनिवार) गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड तेथे आले होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
केंद्र सरकारच्या एनआरसी, सीएए, एनपीआर या कायद्याविरोधात गेल्या ११ दिवसापासून कल्याणच्या केडीएमसी ग्राउंडवर दिल्लीतील शानबागच्या धर्तीवर धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समर्थानासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कल्याणमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भाषणातून मोदी सरकारवर सडकून टीका केली.
नागरिकत्व कायद्याविरोधात गेल्या 11 दिवसापासून कल्याणमध्ये धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्यने महिला सहभागी झाल्या आहेत. या धरणे आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मंत्री जितेंद्र आव्हाड रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी आले. त्यानंतर 11.54 वाजेपर्यंत त्यानी पोलिसांच्या उपस्थितीत भाषण दिले. त्यामुळे न्यायायलच्या आदेश पालन न केल्याने पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.