महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

charge sheet against Awhad : डॉ. जितेंद्र आव्हाडाच्या अडचणीत वाढ, ठाणे पोलिसांकडून 500 पानाची चार्जशीट दाखल - अभियंता अनंत करमुसे

अनंत करमुसे मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्धात ठाणे पोलिसांनी 500 पानांचे चार्जशीट दाखल केले आहे. सर्वोच्च न्यायलयाने ठाणे पोलिसांना ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

charge sheet against Awhad
डॉ. जितेंद्र आव्हाड

By

Published : May 25, 2023, 12:10 PM IST

ठाणे : ठाण्यातील अनंत करमुसे मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांचा सहकाऱ्यांचा बद्दलचा 90 तपास पूर्ण झाला असून त्यासंदर्भात ठाणे पोलिसांनी 500 पानांचे चार्जशीट दाखल केले आहे. तत्कालीन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी आव्हाड यांच्या अंगरक्षकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनंत करमुसे यांना मारहाण केली होती. आव्हाड यांच्या निवासस्थानी अनंत करमुसे यांना मारहाण करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण : ठाण्यातील घोडबंदर येथील अभियंता अनंत करमुसे यांनी एप्रिल 2020 मध्ये ठाकरे सरकारमधील तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याचा रागातून आव्हाड यांचे अंगरक्षक पोलीस आणि कार्यकर्त्यांनी करमुसे यांना घरातून उचलून आव्हाड यांच्या निवासस्थानी आणले. आव्हाड यांच्या नाद या निवासस्थानी करमुसे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांचे स्वीय सहायकासह सहा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या तिघांची विभागीय चौकशी करण्यात आली,पण पोलिसांना आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. ही घटना घडून साधरण दीड वर्ष उलटून गेल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाने उचलले.

90 दिवसात अहवाल देण्याचे आदेश : उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. वर्तकनगर पोलीस ठाण्यात ६ एप्रिल २०२० माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६६ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२१ ला आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान आनंद करमुसे यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायलयाने ठाणे पोलिसांना ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

हेही वाचा -

  1. HSC Results 2023 : विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली; गुरुवारी बारावीचा निकाल, 'असा' करा चेक
  2. Fire broke out timber market : टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव; 5 ते 6 लाकडाचे गोडाऊन जळून खाक

ABOUT THE AUTHOR

...view details